माझा सुद्धा असाच अनुभव आहे !
पण काय करणार ? आलीया भोगासी !
या परवलीच्या शब्दांकरता एका कंपनीने लिहिले होते, ' परवलीचा शब्द हा तुमच्या आवडत्या चॉकोलेटसारखा आहे. - Unique & NOT TO BE SHARED'.
त्यामुळे सर्व पंचाईत होते.
मी तर सर्व असे शब्द एका ठिकाणी (संगणकावरच)लिहून त्याला एक परवलीचा शब्द लावला होता. म्हणजे कसं कि , ती फाइल (मराठी शब्द ?? ) पाहिली कि काम झाले !! (आहे कि नाही सोप्पं),
पण सुट्टीवरून परत आलो आणि काय सर्वच पंचाईत. तो एक शब्द काही केल्या आठवेना. मग हताश होउन, प्रशासकांकडे गेलो. थोडासा रडलो आणि एका कॉफीच्या बदल्यात मला एक नवीन परवलीचा शब्द मिळाला!!! हुश्य.
प्रसाद