मानवाच्या जीवनात भाव-भावना आणि व्यवहार ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

भाव-भावनांवर (पुत्र प्रेम, पत्नी प्रेम, असूया, द्वेष, संशय, पित्याचे प्रेम इत्यादी) रामायण आधारले आहे. तर,

व्यवहारावर (राजकारण, शत्रू पक्षातील सर्व शत्रूच, अंतिम यश हेच ध्येय, प्रसंगी खोटे बोलणे, फसविणे, जुगारातील हार-जित इत्यादी) महाभारत बेतलेले आहे.

ही दोन्ही काव्येच असण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यांची निर्मिती, समाजाला भावना आणि व्यवहार ह्यांची व्यवस्थित सांगड घालता यावी, ह्यासाठी असावी असे वाटते.

कृष्ण हे व्यक्तिमत्त्व 'धुरंदर राजकारणी' असे आहेसे वाटते.