उपास प्रकरणात मला तसा काही इंटरेस्ट नसतो, पण जेवणाची वेगळीच हजेरी घेता येते म्हणून बहती गंगामे हाथ धो लेती हूं ! इतरांचा उपास म्हटलं आणि भगर आमटी केलेली असली की मी पोळी कुस्करून त्यावर मनसोक्त दाण्याची आमटी टाकून सोबतीला हिरवी मिरची मीठाला लावून खाते ! वाऽऽह.. आमटी पोळीत मुरते, मग कुस्करा खाणं कोरडं कोरडं व्हायला लागतं.. मग आणखीन आमटी घ्यायची.. मग मिश्रण थोडं पातळ झालंच्या नावाखाली पोळी घ्यायची.. मग आमटी घ्यायची.. मग पोळी घ्यायची.. आणि मग... !
कल्पनेत गेलेय खरी पण प्रत्यक्षात वर्तमानात आल्यावर डोळ्यात पाणी आलं, आईला दिवाळीमध्ये नाही सांगू शकणार मी दाण्याची आमटी कर म्हणून.