कुठलीही चर्चा, वाद, प्रतिसाद संयमित असावेत.

एखाद्या चर्चेत, एखाद्याच्या प्रतिसादातील एखादाच शब्द आपल्याला पटत नाही. पण अशावेळी मूळ चर्चेचा रोख कुठे आहे, त्याला अनुसरून वरील प्रतिसाद आहे का? असेल तर, त्या न रुचलेल्या शब्दावर व्य. नि.तून चर्चा करावी. मूळ फलकावरील भरकटणारी वादावादी टाळावी.

मुद्द्याला धरून लिहावे, शब्दच्छल करण्याच्या मोहापासून स्वतःला दूर ठेवावे.

आपला मुद्दा एखाद्याला नाही पटला तरी त्याच्या मतांचा आदर राखून आपल्या दोघांचीही मते ठाम आहेत ह्यातून काही निष्पन्न होणार नाही हे लक्षात घेऊन माघार घ्यावी. माघार घेण्यात अपमानकारक काही नाही.

शाब्दिक शक्तिप्रदर्शन टाळावे.

आक्षेपार्ह, प्रक्षोभक, चिथावणीखोर शब्द, वाक्ये, विधाने टाळावीत.

धन्यवाद.