फुगणारे फुलके? हाहाहा.. =))
फुलके करणे अत्यंत सोपं आहे. कणीक घडीच्या पोळीला मळतो त्यापेक्षा किंचितशी घट्ट मळायची. अशा कणकेचा छोटा गोळा घेऊन पीठ लावून घडी वगैरे घालायच्या फंदात न पडता सरळ गोल लाटायचा. तव्यावर टाकून एका बाजूने अगदी थोडंसं भाजून घेऊन दुसऱ्या बाजूने नीट भाजून घ्यायचं. मग जिकडून कमी भाजून घेतलंय तो भाग सरळ आचेवर पडेल अशा बेताने गॅसच्या आचेवर टाकायचा. फुलका पूर्ण फुगेल. चिमट्याने ( मी तर सरळ लाटण्यानेच ! ) फुगलेला फुलका टोपलीत टाकावा. आहे काय आणि नाही काय?
मला पाककृती शास्त्रशुद्ध पद्धतीने नीट सांगता येत नाहीत त्यामुळे चु.भू.दे.घे.