काळ्याभोर ढगांच्या संगतीत, धुंद वाऱ्याने फडफडणाऱ्या चिमणीच्या उजेडात, वड-पिंपळ-उंबराच्या त्रिपेडीच्या बुंध्याभोवतीच्या खाट घालून त्यावर बसून पोळीच्या तुकड्याचा चमचा करून त्यातून किंवा भाकरी कुस्करून त्यात टाकून खाऊन बघ दाण्याची आमटी ! यात आणिक वाढायला माझी आऊ असली तर काळीजही काढून द्यायला तयार आहे मी या सर्वासाठी !