निळ्या नितळ आकाशी
शुभ्र ढगांची आरास
सोनपोपटी पालवी
शोभे तोरण दारास

सारा पूर्ततेचा ऋतू
शिगोशीग झाली सुगी
माजघर तुडुंबले
तृप्त हासली कणगी

दर्जेदार काव्य.

अभिजित