जी.एं. ची ही मतं पूर्णपणे पटतात. 

सायंकाळी निश्चल पाण्यावर संधिप्रकाशाची अंगुली फिरू लागली, की मनाला जी हुरहूर लागते, आर्ततेचा ओलावा भासू लागतो, त्याचे कारण, त्याचा अर्थ सारे अनाकलनीय ( आणि आकर्षक)असते.
काव्यातील अशा कोमल, अबोध अनुभवांनीच आयुष्यातील स्वप्ने विणली जातात. त्यांच्यापुढे दैनंदिन जीवनात वापरून वापरून निबर, निगरगट्ट किंवा मळकट, निर्लज्ज झालेल्या शब्दांच्या बंदिखान्यात आनंदाने बसणाऱ्या क्षुद्र अर्थाची पर्वा काय? अर्थ सांगण्यासाठीच जर काव्य लिहावयाचे, तर मनुष्याने काव्य कधीच लिहिले नसते.
अर्थासाठी तळमळणाऱ्या लोकांकरिता मामलेदाराच्या स्वागतासाठी शाळामास्तरांनी लिहिलेल्या स्वागतगीतांची एक सस्ती आणि घरेलू आवृत्ती कोणी अर्थवाला प्रकाशक प्रसिद्ध करेल काय?
त्या शब्दांचा शब्दश: अर्थ घेतला तर जन्म आणि मृत्यू हे दोनच विषय 'युनिव्हर्सल' ठरतात. त्या निकषाने मग बेळगावच्या म्युनिसिपालिटीतील जननमरणाचे दप्तर जगातील महाप्रचंड महाकाव्य ठरायचे!

क्या बात है!
'मनोगत' वर जी.एं. बद्दलची वाढती उत्सुकता ही 'मनोगत' वयात येऊ लागल्याचे लक्षण आहे, असे मी मानतो.