काव्यानुभव ही मुख्यत्वेकरून जाणीव आहे. माझी दहा मिनिटे देतो, दोन ओळींचा अर्थ व चार शब्दभर तात्पर्य टाक, असा भाजी मार्केटमधला तो काही सौदा नाही. काव्य किंवा कला म्हणजे साऱ्यांच्या जीवनात हजर असलेल्या भावनांचा लघुतम साधारण विभाज्य नव्हे.
काव्य म्हणजे काय ते सांगण्यास यापेक्षा अधिक समर्पक शब्द नसावेत. शिवाय हे पत्र मर्ढेकरांच्या कवितेवर टीका करणाऱ्या पत्राचा समाचार घेणारे आहे म्हटल्यावर जीएंचे शब्दच मर्ढेकरांना वाचवू शकतील असाही विचार डोकावून गेला.
आमच्या मते काव्य - मनातले अव्यक्त ,नादमय भाव लयबद्धतेने एका क्षणी कोणताही विरोध न जुमानता कागदावर येतात. असे मनापासून आलेले ते उस्फूर्त काव्य . तसेच मनाला छळत राहून काही विचार नादमय लयबद्धपणे पण प्रयत्नपूर्वक कागदावर येतात; ते सुद्धा काव्य. या दोन काव्यातले अंतर जाणकार ओळखू शकतात. त्या काव्याचा आनंद मात्र प्रत्येकाच्या जाणीवेवर ठरतो. काहींना नाद महत्त्वाचा तर काहींना शब्द. आमच्या मते कोणत्याही एका गोष्टीकडे दूर्लक्ष करून चालणार नाही.
संजोप रावांशी असहमत
'मनोगत' वर जी.एं. बद्दलची वाढती उत्सुकता ही 'मनोगत' वयात येऊ लागल्याचे लक्षण आहे, असे मी मानतो.
उत्सुकता असणे आणि ती दाखवणे ह्या भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे अशी उत्सुकता आधी सदस्यांमध्ये नसावीच असे सुद्धा म्हणता येत नाही. शिवाय केवळ जी.ए. बद्दल उत्सुकता दाखवली म्हणजे वयात येण्याचे लक्षण असे आम्हाला तरी वाटत नाही. जीए किंवा इतर साहित्यिक आवडणे आणि तोच प्रगल्भतेच्या मूल्यमापनाचा दंडक ठरणे हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. आम्हाला जे. कृष्णमूर्ती, वि.दा.सावरकर ह्यांच्या लेखनाबद्दल जास्त इथे लेखन झाले तर मनोगत वयात आले असे वाटेल.
उजदारी गटार- पुढच्या दारी असलेले गटार(उजदार- घराच्या पुढचे दार)