मागे एकदा संस्कृतीची व्याख्या 'समाजातील लोकांना मान्य अशी जीवनपद्धती' अशी वाचल्याचे आठवते.
- संस्कृतीची इतकी वर वर ची भाषा योग्य वाटत नाही. आज समाजात खूप नको त्या गोष्टी जीवनपद्धती होऊन बसल्या आहेत. पूर्वी सती जाणे, हुंडा घेणे जीवनपद्धती होती, पण ह्या गोष्टी संस्कृतीत बसत नाहीत. ह्या गोष्टी काही स्वार्थी लोकांनी रूढींच्या नावे चालवली.
वरील वाक्य कोणत्या लेखकाचे आहे, त्या लेखकाची सामाजिक जाण काय? काही माहिती नाही! त्यामुळे ह्या वाक्याचे फारसे गांभीर्य वाटत नाही.
गीता-ज्ञानेश्वरी मध्ये जे काही सांगितले आहे ते फारफार तर भारताच्या परंपरेत मोडू शकते.
विचार वाचून गंमत वाटली.. गीता-ज्ञानेश्वरी ह्या गोष्टी फक्त ऐकण्यातच आलेल्या आहेत असे जाणवते!
गीता-ज्ञानेश्वरी ही परंपरा नाही, तेथे आपल्या हिंदू धर्मा बद्दल लिहिले आहे!!
परंपरा आणी धर्म ह्यात खूप खूप अंतर आहे..
आणी हाच मुख्य फरक समजत नसेल, तर इतर सर्व बोलणे म्हणजे चुन्याची निवळी घुसळून लोणी निघण्याची वाट पाहण्यासारखे वाटते!
अंधश्रद्धा, हुंडाबळी, जातिभेद यासारख्या चालीरीती या सध्याच्या संस्कृतीचाच भाग झाल्या.
- मुख्य संस्कृती म्हणजे काय, ह्या बद्दल गैरसमज असल्यावर असे विचार येणारच. हुडा हा आपल्या संस्कृतीत नाही, ह्या गोष्टी काही स्वार्थी लोकांनी रूढींच्या नावे चालवली आहेत.
प्राचीन धर्मशास्त्रात जे काही सांगितले आहे ते सर्व बरोबर यावर माझा स्वतःचा विश्वास नाही.
- धर्मशास्त्रात काय सांगितले आहे, ह्याचे पूर्णं ज्ञान किंवा त्याची थोडीशी अनुभूती नसल्यास असेच वाटते. धर्मशास्त्र फार मोठा विषय झाला.. त्यात खूप वाचन येते.. इतके की आयुष्य अपुरे पडेल.. सध्या गीता-ज्ञानेश्वरी-रामायण हे ग्रंथ समजले, तरी नसतेच भलते - सलते विचार येणार नाहीत.
'वांसासि जीर्णानि यथा विहाय' :
ह्याचा खरा अर्थ काय?
लाचखोरी भारतीय परंपरेत नक्कीच नाही पण २१ व्या शतकाच्या भारतातील जीवनपद्धतीचा (संस्कृतीचा?) तो एक अविभाज्य भाग आहे हे नक्की.
मुख्य मुद्दा हा, की जरी तो समाजाने नाईलाजाने स्वीकारला असला, तरी तो संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही, म्हणजेच,
'समाजातील लोकांना मान्य अशी जीवनपद्धती म्हणजेच संस्कृती' हे म्हणणे चुकीचे ठरते.