संस्कृतीचा जन्म धर्मांतून होतो.
मग यासाठी संस्कृती म्हणजे काय याचबरोबर धर्म म्हणजे काय?याही प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल.आणि या दोन्ही प्रश्नांची अचूक व सर्वसमावेशक उत्तरे शोधणे सोपे नसावे असे माझे मत आहे.कारण 'धारयति इति धर्मः' अशी धर्माची एक व्याख्या केलेली आहे.तसेच' कर्तव्य' अशा अर्थानेही धर्म हा शब्द प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथांमध्ये वापरलेला दिसतो.मी स्वतः संस्कृतातील गीता वाचली आहे.त्याच्या जोडीला लो.टिळकांचे 'गीतारहस्य' देखील वाचले आहे.पण यावरून आपली संस्कृती समतोल होती/ आहे असे मला काही जाणवले नाही.
धर्मशास्त्र सांगणारे वैदिक परंपरेतील ग्रंथ आपण वाचले आहेत का?त्यांचे आणि आपण म्हणता त्या धार्मिक ग्रंथाचे वाचन,चिंतन आणि अवलंब करून आजच्या काळातील समाजरचना कशी बदलता येईल?आणि आपणच उल्लेख केलेल्या (हुंडा,जातीभेद आणि असे अनेक!)समस्यांचे निराकरण कसे होईल?
रुढी,परंपरा या गोष्टी संस्कृतीमध्ये अंतर्भूत होत नाहीत?
'वांसासि जीर्णानि यथा विहाय' -
गीतेमधून उद्धृत केलेल्या वरील ओळीतील पहिला शब्द 'वासांसि ' असा लिहिणे योग्य आहे.वांसासि नव्हे!