माझ्या गीता वाचनातून मला आपल्या संस्कृती बद्दल ती समतोल आहे हेच समजले.

गीता वाचनातून, भेद - भाव हाच समूळ कसा निरर्थक आहे हे समजल्यावर स्त्री - पुरुष / आपला - परका / तुझा - माझा / उच्च - निच / गरीब -  श्रीमंत इत्यादी व अशी अनेक भेद भावांची दरी नाहीशी होते.

भेद - भाव मग तो कोणत्याही प्रकारचा असो, तो तुच्छ मानला आहे.

भेद - भाव तयार केला गेला - रुजवला गेला तो स्वार्थी लोकांनी. 

धर्म, संस्कार, रूढी, परंपरा ह्या सर्व वेगवेगळ्या गोष्टी आहेत. - प्रत्येक गोष्टीचा आवाका खूप मोठा आहे.

समाजरचना कशी बदलता येईल?
- प्रत्येक माणसाने (माझ्यासहित) / कुटुंबाने आपल्या सांगितलेल्या धर्माने जाण्याचा प्रयत्न करावा व इतर लोकांना प्रवृत्त करावे. तुमची गीतावाचन आहे, हि चांगली गोष्ट आहे, त्याचा व्यहारात सुद्धा वापर केल्यास तुमच्या लक्षात येईल, समाजरचना बदलण्याची सुरुवात स्वतः पासून करावी लागेल.

दुसऱ्यांना धडा शिकवण्यापेक्षा, आपल्या वागण्याने, विचाराने लोकांना धडा घालून द्यावा.

कोणत्या धर्मात हुंडा घ्यावा, लाच द्यावी, जाती भेद मानावा, स्त्री ला तुच्छ मानावे असे सांगितले आहे?

हिंदू धर्मात माते च्या स्वरूपांत स्त्री पूजनीय मानली जाते.
आपण भारतमाता म्हणून आपल्या देशाला दुसरी आई मानतो.
गोमाता म्हणून गायीला पूजनीय मानतो
किती उदाहरणे देऊ?