संस्कृती म्हणजे काय
संस्कृतीची चर्चा खूप मोठी होईल, तसेच विषयांतर होईल. तुमची जाणून घेण्याच्या इच्छेवरून मला ते थोडक्यात येथे सांगणे अवघड , जिकिरीचे आहे. क्षमस्व.
वैयक्तिक पातळीवर मला ही चर्चा न्यायची नाही.
- सहमत आणि धन्यवाद.
धर्मशास्त्रांचा अभ्यास असलेल्यांनी मला ती योग्य का आहे याची कारणे सांगावीत.
- धर्मशास्त्रांचा अभ्यास असणारी मंडळी जास्त नाही, त्यामुळे, तुम्हालाच त्याचा संदर्भ शोधून, अर्थ समजवुन घ्यावा लागेल. ह्यात बरोबर अर्थ शोधणे हे जिकिरीचे काम होऊ शकते..
'हिंदूंनी विज्ञान हाच धर्म पाळावा'
- धर्मशास्त्र म्हणजे विज्ञानच आहे. आपला धर्म ज्ञाना शिवाय काय देतो? पण बरेच लोक ज्ञाना व्यतिरिक्त इतर फापट पसाऱ्यात अडकून पडतात.
कोणतीच गोष्ट देव किंवा कोणी लोकप्रिय माणूस म्हणतो म्हणून मान्य करायची नाही तर ती स्वतःला पटली पाहिजे. आणि मला जर का एखादी गोष्ट मला पटत नसेल तर ती मी करणार नाही.
- माफ करा, पण मला हे विचार जरा हेकट वाटतात.
तुम्हाला - मला एखादी गोष्ट पटली म्हणजे ती बरोबरच आहे असे म्हणणे चूक आहे.
तसेच, तुम्हाला - मला एखादी गोष्ट पटली नाही म्हणजे ती चूकच आहे असे म्हणणे रास्त नाही.
धर्मशास्त्रांचा अभ्यास करणारे माझ्या परिचयातले लोक मला 'तू पूजा कर' असे का सांगत असावेत? हे केवळ त्या काही व्यक्तीच करतात की आपल्यासारख्यांचेही माझ्यासारख्यांना हेच सांगणे आहे?
- माझ्या मते, नुसते 'पूजा कर' म्हणून सांगून किंवा एखाद्याच्या बळजबरीने, धाकाने, भीतीने पुजा करण्यास प्रवृत्त करणे योग्य नाही. त्या ऐवजी, पूजेचे महत्त्व काय? का / केंव्हा / कोठे / कशी ह्याची सविस्तर माहिती देणे जरूरी आहे. जर एखाद्याला ते पटले तर, तो कोणी न सांगता भक्तीने पुजा करू लागतो.
माझे म्हणणे एवढेच आहे की, आपला धर्म काय हे आपल्या सारख्या सामान्य लोकांना समजेल अश्या भाषेत ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथराजात योग्य भाषेत सांगितला आहे, तो समजवून घेतला आचरणात आणला, तर आपले जवळ जवळ सर्व प्रश्न संपून जातात. येथे आलेला पुरुष प्रधान - स्त्री प्रधान हा प्रश्न फारच क्षुल्लक वाटतो.
(विषयांतर: माझ्या मुलाने (वय ९ वर्षे) संध्याकाळच्या पुजे आधी विचारले "बाबा, ख्रिश्चन लोक जसे फक्त रविवारी देवासमोर जातात, तसे आपण फक्त रविवारीच पुजा का करू नये?" मी सांगितले "तो देव वरून प्रत्येक अडचणीला आपल्या मदतीला येतो, तो आपली प्रत्येक क्षणाला काळजी वाहतो, त्याच्या करता तुझ्याकडे पूर्णं दिवसात ५ मिनिटे नसतील, तर तू पुजा नाही केली तरी चालेल."
माझे वाक्य संपल्यावर तो पूजेला गुपचुप बसला.)