प्रणयाने ओतप्रोत भरलेली गझल. अतिशय सुंदर. गजऱ्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या रूपकातून उलगडलेले स्वभावदर्शन विशेष आवडले.
जरी ती नको नको म्हणे पण खरे नव्हे ते
जुमानू नको विरोध, जा विस्कटून गजरा
नव्याने तुला पटेल ओळख कळी-कळीची
नव्याने पुन्हा बघून जा उलगडून गजरा
वावावा!! निव्वळ अप्रतिम!
जरा टाकता कटाक्ष मी वेगळ्या फुलावर
कसा रात्रभर अबोल होतो रुसून गजरा
हे सुद्धा खासच (नि जरासे खट्याळही!) ;)
शुभेच्छा.