आश्विनाचे आले दिस
शेवंती हळदी हासे
रंग उत्सवी झेंडूचा
कामिनी धरणी भासे

निळ्या नितळ आकाशी
शुभ्र ढगांची आरास
सोनपोपटी पालवी
शोभे तोरण दारास

अप्रतिम निसर्गवर्णन. बा. भ.बोरकरांची ' सायंकाळची शोभा' आठवली.