खूप मजेदार लेख आहे. पण अशा इंग्रजीयुक्त बोलण्याचा मला एक फायदा झाला. पूर्वी मी बंबईया हिंदी बोलत होतो तेंव्हा "सुंदर /मीठे" घोटाळे व्हायचे. आता स्टार प्लस, सोनी वरील हिन्दी ऐकून मै किसी मॅटरपर कॉन्फिडंटली आर्ग्यू करनेमें डिफिकल्टी फील नही करता. आणि हे बोलणे सहज खपून जाते.

एका दुकानात मी  एकाच कंपनीने एकाच प्रकारच्या कापडापासून बनवलेले दोन टी शर्ट पाहिले. त्यातल्या एकाची किंमत दुसऱ्यापेक्षा वीस रुपये जास्त होती. "कां" म्हणून विचारल्यावर दुकानदार म्हणाला, " कारण तो वाईट आहे".  मी मला आवडलेला निळ्या रंगाचा स्वस्तातला टी शर्ट घेतला. बऱ्याच वेळानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की दुसरा टी शर्ट "व्हाईट" होता.