मला अमुक असे वाटते म्हणजे तेच अंतिम सत्य आहे असे यापूर्वीच्या काही लिखाणाचे अर्थ निघाल्याने आपल्या मताला 'असे मला वाटते' ,'असे माझे मत आहे', 'असे मी मानतो' असे शेपूट लावण्याची सावध भूमिका घेणे मला भाग पडले आहे. उत्सुकता असून ती न दाखवणे यामागचा कार्यकारणभाव माझ्या तरी लक्षात येत नाही. आणि जे. कृष्णमूर्ती आणि सावरकरांविषयीच्या लिखाणाबाबत म्हाणायचे तर आय कुडन्ट केअर लेस. जे जी.एं. ना लागू तेच कृष्णमूर्ती आणि सावरकरांनाही. मग जर सगळे इतके सापेक्ष आहे तर जीवन जिज्ञासा यांच्या या प्रतिसादाचे प्रयोजनच काय?