आदरणीय संगीतसूर्य तात्या
पण कुठल्याही वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचा मी अर्ध्या तासाच्या वर आनंद घेऊ शकत नाही. गाणारे गुणी असतात, चांगलेच असतात. पण काही वेळाने कंटाळा येतो. याची दोन कारणं असावीत, एक तर दोन दोन, तीन तीन तास ख्याल ऐकायची सवय,
याच कारणाने थोरली व धाकटी यांच्या ३ - ४ मिनिटांच्या गाण्यांचाही कंटाळा येत असेल. त्या दोघींना शास्त्रीय संगीत/ ख्याल गायचा सल्ला दिलात का? बाबूजी तर आपले मित्र. तेही याच प्रकारात मोडणारे.
मला स्वतःला असे कार्यक्रम ऐकायला आवडतात. कारण थोरली - धाकटीच्या गाण्यांच्या तबकड्या वाजवून - ऐकून गुळगुळीत झालेल्या असतात. त्यामानाने नवीन गायक/गायिकांच्या गळ्यातून गाणी ऐकली तर बरे वाटते.