पण कुठल्याही वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचा मी अर्ध्या तासाच्या वर आनंद घेऊ शकत नाही. गाणारे गुणी असतात, चांगलेच असतात. पण काही वेळाने कंटाळा येतो. याची दोन कारणं असावीत, एक तर दोन दोन, तीन तीन तास ख्याल ऐकायची सवय,

या वाक्याचा मी घेतलेला अर्थ असा, आम्ही शुद्ध शास्त्रीय संगीत/ख्याल ऐकणारे. म्हणूनच सुगम संगीतवाल्यांपेक्षा थोडेसे वरचे. त्यामुळे अर्थातच सुगम संगीतातले ३-४ मिनिटांचे गाणे ऐकताना मन रमत नाही. त्यातून ऐकायचेच झालेच तर थोरली, धाकटी, बाबूजी अशा दिग्गजांचे ऐकतो, चिल्लर लोकांचे नाही.

मी वरील अर्थ चुकीचा लावला असल्यास क्षमस्व.

बाबूजी आपले मित्र म्हटल्याने आपण दुखावले गेले आहात. त्याबद्दल क्षमा मागते. माझा मुद्दा हा विभावरी वगैरे लोक हे लता - आशाच्याच पंथातले आहेत, उलट त्यांच्या आवाजात जुनी गाणी ऐकताना चांगले वाटते, इतकाच होता.