त्या कार्यक्रमाला मी मध्यांतरानंतर उपस्थित होतो. "हाय रे तेरे चंचल नैनवा" हवे होते पण चित्रगुप्त "दिल का दिया जलाके गया". विभावरी आपटे आपल्या साजुक आवाजात, आपल्या मर्यादा सांभाळून नेहमीप्रमाणे उत्तम गायली. (तिचा आवाज कसा नेहमी डोक्यावरून पदर घेऊन येतो.) अपूर्वा गज्जलाचे आवाजातला अल्लडपणा, कोवळेपणा विशेष आवडला. गाण्यात मोकळेपणा आहे. इतर कलावंतदेखील छान.
चित्तरंजन