जरी ती नको नको म्हणे पण खरे नव्हे ते
जुमानू नको विरोध, जा विस्कटून गजरा
नव्याने तुला पटेल ओळख कळी-कळीची
नव्याने पुन्हा बघून जा उलगडून गजरा
जरा टाकता कटाक्ष मी वेगळ्या फुलावर
कसा रात्रभर अबोल होतो रुसून गजरा
असे काय बोललास गुंजारवात त्याला
पहा, भृंग, लाजण्यात गेला गढून गजरा
मस्त रोमँटिक गझल! या गजऱ्यातील पाकळी न पाकळी आवडली.
फक्त पहिल्या ओळीतला मनगटावरिल गजरा का कोण जाणे खटकला.
साती