असा शब्द सहज भेटायला आल्यावर काय करायचे?
जाणून घ्यायचे त्याचे अंतरंग
त्याचे भाजलेपण
त्याचे अस्तित्व?


असे अर्थलागण न झालेले शब्द
जमवतोय मी... उल्कांचे अवशेष
पण वापरतोय परिचित हत्यार
यमक, गमक, मात्रा, वृत्ते, अलंकार
त्यांच्या जपणुकीसाठी

सतत काय मिळाले हे शोधणारे लोक
कित्येकदा येतात भावार्थ हुंगत
आणि नाकारून जातात...
खूप चिरंतन असे काही
माझा नाइलाज आहे!

रुद्रायन हे निराकार आहे!
अशा रचनेचा अर्थ काय लावाल
बापड्यांनो?


लावलेला अर्थ १:
हे निराकार रुद्रायन बरेचसे अर्थधूसर आहे. कल्पना चांगली आहे. पण उल्कांच्या वर्षावाचा रुद्रायनाशी जवळचा संपर्क प्रस्थापित होत नाही. उल्का दुरूनच निघून जातात.

असे अर्थलागण न झालेले शब्द जमवतोय मी... उल्कांचे अवशेष सारखे शब्दपुंजके मनात ठसतात.
पण

पण वापरतोय परिचित हत्यार
यमक, गमक, मात्रा, वृत्ते, अलंकार
त्यांच्या जपणुकीसाठी

सतत काय मिळाले हे शोधणारे लोक
कित्येकदा येतात भावार्थ हुंगत
आणि नाकारून जातात...
खूप चिरंतन असे काही
माझा नाइलाज आहे!

नेहमीचेच. भावार्थ हुंगत येणारे लोक लक्षणीय.

तशी एकूण कविता हुशार आहे. पुन्हा किपलिंगची आठवण होते. तो म्हणायचा, "It's clever. But is it Art?"

लावलेला अर्थ २: शुद्धिचिकित्सक वापरल्यास 'घ्याय्चे', 'व्रुत्ते', 'जपणुकिसाठी, 'खुप' सहज टाळता येईल. अशा चुका वाचताना डोळ्यांत खुपतात.


टीकाराम