इतिहासाच्या पुस्तकातील व्यक्तींव्यतिरिक्त स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या व्यक्तीचे लिखाण प्रथमच वाचत आहे. छान वाटले.

आमच्या सशत्र दलाच्या बळावर गोर्‍यांनी त्यांचे साम्राज्य आणि आमचे पारतंत्र्य सांभाळले होते. फोडा आणि झोडा हे तत्त्व आचरणात आणून आमच्या सशस्त्र दलातही त्यांनी उच्च-नीच भाव वाढत ठेवून, परस्परांत संशय आणि द्वेषपेरणी यशस्वी रीत्या जपल्या होत्या. ऑफिसर्स आणि अदर रॅंक्स यामधील दरी खोल आणि जास्तीत जास्त रूंद करून अंतर ठेवण्याचे यत्न, पराकाष्ठेने प्रयत्नपूर्वक साकार केले होते. भावनिक प्रसंगी, किंवा प्रसंग पडलाच तरीही अधिकारी आणि सैनिकांत ऐक्य होऊच नये म्हणून, डिसिप्लिनच्या नावाखाली, घोडेस्वार आणि घोडा, असे परस्पर संबंध ठरवून दिले होते. म्हणून आमच्याच लोकांकडून आपलेच लोक.. आपलीच माणसे दबले जात होते.

आज इतक्या वर्षांनीही अजूनही इंग्रजच आपल्यावर राज्य करत असल्यासारखे वाटत आहे कारण परिस्थितीत काहीही सुधारणा नाही.

पुढचा भाग लवकर येवो.