ण" चा वापर  मराठी शब्द प्रयोग़ात जास्त होतो. आणि न" चा वापर हिंदी शब्द प्रयोग़ात जास्त होतो. जसा ळ" चा वापर हिंदी शब्द प्रयोग़ात होतच नाही.

देवनागरी लीपीही जेव्हा पासुन प्रचलीत झाली (ही लीपी एका दगडावर लिहून ठेवलेली अस मी ऐकलय) तेव्हा पासुनच ती पारंपारीक रीत्या चालत आलेली आहे. त्यावेळी त्याची मांडणी ऊच्चारानुसार जाणकारांनी केली गेली होती (त्याला बाराखडी म्हणतात) त्यामुळे त्यात बदल अशक्यच. उदा. एखाद्याने "चालणार" ला "चाल्णार " असे वापरले तरी अर्थात व ऊच्चारात काही फरक नाही परंतु त्याचा वापर चुकीचा आहे. तेव्हाच जर "चाल्णार " हा शब्द प्रचलीत झाला असता तर आपल्याला "चालणार" हा शब्द चुकीचा वाटला असता. आपण स्वतः च ह्या चुका काढतो.

उदा. सायकोलोजी मधील सुरवातीला  पी चा वापर हा सुद्दा एक वादच आहे. पण प्रचलीत असल्यामुळे चालत आलेला आहे. आणि तसा त्या "पी" चा वापर ऊच्चारात सुद्दा होत नाही. जे शिकलो तेच चालु राहणार व आपण ही पुढे तेच शिकवणार ....