शिंपल्यासारखे मृदुकाय जीव आपल्या शरीरातून जो स्त्राव सोडतात, ज्याचा शिंपला बनतो नाहीतर शिंपल्यात आलेल्या वाळूच्या कणावर त्याची पुटे चढून मोती बनतो, त्याला लुकण असे म्हणतात असे वाचल्याचे स्मरते. (स्वामी विवेकानंदांनी, जीव आपल्याभोवती असे लूकण सोडतो आणि तीच माया अथवा भासमान जगत आहे, असे कुठेतरी म्हटलेले स्मरते.)
तर, लुकण हा सिमेंटला प्रतिशब्द, तितकासा चपखल वाटत नाही.
त्यापेक्षा सांधणे, एकत्र धरून ठेवणे इत्यादी क्रियापदांचे नाम करता आले तर ते जास्त बरे वाटेल.
--लिखाळ.