मृदुला,
सर्वप्रथम, माझ्यासारख्या कितीही खाल्ले तरी वजन वाढत नाही. जिकडे तिकडे मिताहाराची आणि त्यावाचून उद्भवणाऱ्या रोगांची चर्चा ऐकून नक्की काय खावे, काय करावे सुचत नाही अशा समदुःखीची बाजू मांडणारा लेख लिहिल्याबद्दल आभार. यातून अनेक नवे उपाय कळतील आणि वजन वाढवण्यास मदत होईल ही आशा आहे. :)

मी केलेले उपाय येथे लिहितो.
१. माझे तसे भरपूर खाण्याकडे  कमीच मन आहे. मला चांगले पदार्थ खायला /करून खायला आवडते पण भरपूर खाल्ले म्हणजेच समाधान झाले असे मला वाटत नाही. दोन घास खाल्ले तरी मला तृप्ती वाटते आणि मग भूक पुरेशी भागली नसेल तरी मला चालते. हे जाणवल्या पासून मी मुद्दामून समवयस्क किती खातात आणि त्यांची खाण्याची कल्पना काय आहे याचे निरीक्षण केले. आणी मला आढळले की ते भरपूर खातात :). आता मी माझे मन तसे वळवतो आहे. 
अनेक वेळा खाणे असाही त्यावर एक बरा उपाय आहे. म्हणजे पोटात जास्त अन्न जाते.
२. रोज दोन केळी. हा खात्रीशीर उपाय.
३. पोटातील मंद अग्नी, अनेकदा खाण्यावरची वासना कमी करतो. तसेच, मंद अग्नीमुळे पचन भराभर होत नाही आणि परिणामत: भूक कमी लागते. त्यावर उपाय म्हणजे जेवण्याआधी तीस चाळीस मिनिटे ग्लासभर पाणी प्यावे याने खमखमून भूक लागते असा माझा अनुभव आहे. तसेच जेवणाआधी साजूक तुपानच्या सेवनाने सुद्धा भूक वाढते आणि त्यायोगे पचनसुद्धा चांगले होते.
४. धावपळीचा व्यायाम.
५. आठवड्यातून एकदा उपवास (लंघन). मी त्या दिवशी काहीही खात नाही. नुसते पाणी अथवा फळांचे रस पीतो. तसेही, आपण गरज नसताना फारच खात असतो, असे माझे लहानपणापासूनचे मत आहे. त्या दिवशी मला फार बरे वाटते. अनेकदा तर मी दोन दिवस आधीपासून उपवासाच्या दिवसाची वाट पाहतो :)
६. मन:शांती. ही कशी मिळवावी ते मला माझ्या पुरते समजते आहे असे अनेक वेळा वाटते.

इतरांचे अनुभव ऐकण्यास उत्सुक.
--लिखाळ.