मोरू साहेब,

१. शारीरिक दृष्ट्या मुलींची वाढ त्याच वयाच्या मुलापेक्षा लवकर होते (हार्मोन्स मुळे). त्यामुळे पुढील 'वैवाहिक जीवन' सुखी जाण्यासाठी मुलींचे वय कमी असणे गरजेचे आहे.  

बरोबर आहे, पण त्याचा लहान असण्याशी काहि संबंध नाही.

२. पहिल्या बाळंतपणा नंतर मुली अचानक थोराड वाटू लागतात. म्हणून त्यांचे वय लग्नाच्या वेळेस मुलापेक्षा २-३ वर्षे कमी असावे.

अचानक बघितल्यावर वाटु लागतात?

३. घरच्यांची आणि नातेवाईकांची सुप्त इच्छा असते की आपल्या मुलाने कमी वयाच्या मुली बरोबरच लग्न करावे किंवा प्रेमात पडावे. याउलट जास्त वयाच्या मुली बरोबर प्रेम झाले तर मुलीनेच याला गळाला लावला अशी चर्चा सुरू होते किंवा घरच्यांकडून विरोध होतो.

बव्हंशी बरोबर आहे, पण नेहेमिच नाही.

४. मुलगी १-२ वर्षे मोठी असेल तर ठीक आहे. पण ५-६ वर्षे मोठी म्हणजे आंधळे प्रेम होय. मग घरातून विरोध झालाच समजा. याबाबतीत एक अनुभव असा की नेमके हेच केलेल्या मुलाशी त्याच्या घरच्यांनी संबंध तोडून टाकले.   

असहमत, जर घरच्यांचा विरोध असेल तर तो १-२ वर्षे मोठ्या असलेल्या मुलीलाही होतो.

५. जर मुलगी मुलापेक्षा मोठी असेल तर, ती मुलापेक्षा विचारांनी जास्त प्रगल्भ असतात. याउलट कमी वयाच्या मुलींमध्ये अल्लडपणा जास्त असतो. त्यामुळे जास्त वयाची मुलगी असणे हे फायदेशीर आहे.

बरोबर आहे, पण फ़ायदा हा शब्दप्रयोग करु नये.

६. मुलगी वयाने ५-६ वर्षे मोठी पण विधुर/घटस्फोटित असेल तर तिच्याशी लग्न करायला काही हरकत नाही. पण तिला जर मुले असतील तर हा एक मूर्खपणा आहे.

मुर्खपणा नसुन जवाबदारी पासून लांब पळण्याची कारणे आहेत.

७. जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली असली आणि वयाने मोठी असली तर तुम्ही घरच्यांचा विरोध जुमानून लग्न केले पाहिजे.

बरोबर आहे, आणि सहसा जास्त विरोध होत नाहि.

८. मुलगी जर हसत-खेळत राहणारी असेल तर तिच्या वयाने काहीही फरक पडत नाही. ती कायम मानसिक दृष्ट्या लहानच असेल.

बरोबर, पण ती मानसिक दृष्ट्या लहानच असली पाहिजे असे नाही. काहिंचा स्वभावच खेळकर असतो.

मी हे मुद्दे मांडु शकलो कारण मीही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मुलिशी लग्न केले आहे.