बंद आवाज म्हणजे काय ते फक्त त्या अनुभवातून गेल्यावरच कळतं (आणि ज्याचं जळतं त्यालाच कळतं !!!!..)) असो.
एक विनोद:
स्थळ: नायगारा धबधबा, अमेरिका
मार्गदर्शक एका पर्यटकांच्या गटाला माहीती सांगत असतो ,
"हा नायगारा धबधबा कधीही थांबलेला नाही. जगातील जवळजवळ २०% पाणी या प्रवाहातून पडते. सेकंदाला ७ लाख गॅलन इतक्या प्रमाणात पाणी पडते. या पडणाऱ्या पाण्याचा आवाज एक मैलापर्यंत जातो.
तेंव्हा हा आवाज ऐकण्यासाठी, महिलांनो, जरा गप्प बसा "!!!
(ह. घ्या. - हे सांगणे न लगे)
प्रसाद.