आलेला परप्रांतीय पैसा कमावण्याचे मशिन/जागा याच्यापलिकडे महाराष्ट्राकडे बघतो का? कुठलीही आदराची भावना महाराष्ट्र व मराठी संस्कृती यांच्याबद्दल का नसते यांच्या मनात?
९९% खरे आहे.
मुंबईला अन्नदात्री/ कर्मभूमी नाही समजत
एखादा अपवाद वगळता खरे आहे.
पण तरी यावर उपाय त्यांना यायला नुसता विरोध करणे हा नसून आपली ताकद आणि कर्तुत्व वाढवणे हा आहे.
सहमत!
कुणी काहीही म्हणा पण नुसते मुंबईला ओरबाडायची या परप्रांतियांची वृत्ती पाहिली की भयानक राग येतो. इथल्या जनतेने कर भरून जो पैसा उभा केलाय तो या लोकांनी केलेली घाण निस्तरण्यात संपतो. मुंबईतल्या दंगली, मालेगावातल्या दंगली यात या यू. पी. बिहार मधून आलेल्या लोकांचा सहभाग किती हे आपण जाणतोच.
अगदी माझ्या स्वतःच्या अनुभवातून बोलायचं म्हटलं तर मुंबईच्या आरोग्यसेवेवर या लोकांमुळे अत्यंत भार आला आहे. वाढता बकालपणा, गलिच्छ राहाणी यांमुळे किमान मुंबईत तरी साथीच्या रोगांमुळे इस्पितळात भरती होणाऱ्यांत या लोकांचे प्रमाण खूप जास्त असते.
एखादा माणूस जेव्हा उपचारांसाठी पैसा उभा करू शकत नसेल तेव्हा त्याला सोशल वर्करकडे मदतीसाठी पाठवलं जातं. महाराष्ट्राच्या कुठल्यातरी खेड्यातून आलेल्या माणसाला पिला राशन कार्ड नही म्हणून मदत मिळत नाही त्याचवेळी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत आलेला यु.पी. वाला दोन दिवसात म्हणाल त्या रंगाचं राशनकार्ड मोबिलाईज करून मदत कशी मिळवतो हे माझ्यासाठी कोडंच आहे.
तिकडून आलेले, झोपडपट्ट्यातून राहणारे आणि जरी, भरतकाम यांसारख्या कामात बालमजूर म्हणून काम करणारे जेव्हा आजारी पडतात तेव्हा त्यांचे मालक खुशाल त्यांना इस्पितळात भरती करून गायब होतात. त्यांचा खर्च मग होतो मराठी जनतेच्या खिशांतून. आणि जरीवाले मालक मात्र पैसा कमवून आपापल्या राज्यांची भर करतात.
तुम्ही या, रहा आमचं काही म्हणणं नाही. पण जिथे राहाताय तिथले नियम पाळा, तिथेच घाण करून तिथल्याच लोकांना त्रास देऊ नका असेच फक्त आमचे म्हणणे आहे.
अवांतर:- मी गेली दहा वर्षे मुंबईत राहातेय पण नियमांनुसार मुंबईकर नाही. पण मुंबईवर माझं अतिशय प्रेम आहे.
साती काळे.