पण त्यातल्या चमत्काराच्या भागाचे तार्किक स्पष्टीकरण दिले असते तर आवडले असते.
मृदुला, मिलिंदा, पेठकर . . . . सर्व,
काय तार्किक स्पष्टीकरण देणार मी ? आणि मी जरी स्पष्टीकरण दिले तरी ते मान्य होणार का ? नाही. निसर्गातल्या कितीतरी गोष्टी अगम्य असतात, बऱ्याच गोष्टी अनुभवाच्या असतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला साधायला तर सोडाच पण समजण्यासाठीही एक बैठक लागते (पात्रता म्हणणार होतो, पण वाटले वाद निर्माण करणारा शब्द). रामानंद सागरांचे रामायण बघत असतांना एक बाण सुटल्यावर दुसरा बाण त्याला छेदतो हे पाहून काहीतरी 'अती' वाटायचे. १०-१२ वर्षापूर्वी झालेल्या इराक युद्धात जेव्हां intercept करणारी क्षेपणास्त्रे पाहिली तेव्हां तो अचंबा गेला. आठ वर्षापूर्वी कोणी स्कूटरवर जात असतांना हवेत बडबडतांना दिसला आणि म्हणाला मी दिल्लीतल्या मित्राशी बोलतोय तर त्याला वेडा म्हणायचे. आता आपल्याला समजते की त्याच्या खिशात मोबाइल आहे आणि शर्टाला माइक आहे. ही उदाहरणे योग्य नाहीत मला माहीत आहे, पण ह्या गोष्टी आता 'अगम्य' रहिल्या नाहीत एवढेच दाखवायचे होते. पण ह्याच गोष्टी (संजयाचे दूरदर्शन) योग्यांना सहज शक्य आहेत. श्री ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत जर म्हणतात 'मुंगीचिये मनीचे ओळखे, स्वर्गींचा आलोचु आइके' तर ते वाचकाचे रंजन करण्याकरिता खचितच नाही. ह्या त्यांच्या स्वानुभवाच्या गोष्टी. त्याची वाच्यता त्यांना करावीशी वाटली नाही एव्हढेच. आता नुकतेच बंगलोरच्या एका तरुणानें तान्ह्या मुलांचा कावीळ बरा करण्याकरितां एक यंत्र शोधले. असे यंत्र काही वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्याने बनवले आहे ते फक्त $ ५०० ला उपलब्ध होणार म्हणून त्याला बक्षीसही मिळाले. पण १० वर्षापूर्वी कोणी यंत्राने कावीळ बरा होतो यावर मीच विश्वास ठेवला नसता. नुसते मंत्र म्हणून पिवळ्या धम्मक नागाचे विष उतरते म्हटले तर मला हसू यायचे. पण हे मी प्रत्यक्ष पाहिले तेव्हां पटले. माझी पत्नी 'रेकी' मास्टर आहे (आणकी एक वादाचा विषय नाही का ?). तिने तीन संधीवाताचे रोगी पूर्णपणे बरे केले आहेत. पण चवथा बरा झाला नाही. सुरुवातीला आम्ही दोघे 'रेकी' साधना करायचो. पण अपेक्षित प्रगती न दिसल्यामुळे मी सोडून दिले. पण तिची १० वर्षाची साधना आहे. ३-४ महिन्यापूर्वी एका भाच्याला १० वीच्या परीक्षेत जेव्हां (परीक्षा चालू असतांना) मुलाच्या आईने मुलाच्या आईने फोन करून विचारले , 'कसा चाललाय त्याचा पेपर ? ' हिने सांगितले 'sound' ह्या संबंधी जे नियम असतात त्याबद्दल त्याचा काहीतरी १० मिनिटापासून गोंधळ होत होता पण आता तो प्रश्न सुटलाय. ' मुलाने घरी आल्यावर 'असेच' झाले होते म्हणून कबूल केले. हे असे परीक्षा संपेपर्यंत रोजच चालायचे. (परीक्षा चालू असतांना 'रेकी' पाठविण्याचा उद्देश असायचा की मुलाला माहीत असलेले वेळेवर सुचावे. त्याची बहीण गेले चार वर्षांपासून नियमितपणे परिक्षेच्या वेळी रेकी पाठवायला सांगते. तिला काही अनुभव येतो. पण हीच रेकी माझ्या मुलाला परीक्षेच्या वेळी लागू पडत नाही. आता. कोणी फोन करून सांगतात 'कान दुखतोय, रेकी पाठव. आणि अर्ध्या तासाने फोन येतो 'कान दुखायचा थांबला'. कधी कधी असे होतही नाही. सामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टींत नैपुण्य मिळवायला बरीच वर्षेही खर्च करावी लागतात. असे सामान्य जनही कधी कधी आकलन न होणाऱ्या गोष्टी करतात. अष्ट महासिद्धि योग्यांची गोष्ट तर सोडाच. त्यांना असले रोग बरे करण्याकरिता हात लावायची सुद्धा आवश्यकता नाही. नुसत्या दृष्टीपाताने देखील हे घडू शकते. असे योगी दुर्मिळच आढळतात. आणि तेही काही 'करत' नाहीत. त्यांच्या हातून नकळत घडतात. रामदासांनी कधी चमत्कार केले नाहीत, ते घडले.
शंकराचार्य धर्म जागृतीचे काम करत होते. कोणावर इंप्रेशन मारण्यासाठी हे (आणि असेच अजून काही आहेत) केले असे मला वाटत नाही. त्यांचा एक शिष्य पद्मपाद ह्याचे नाव ऐकले आहे ? त्याचा चमत्कार ऐकाल तर अजिबात मान्य होणार नाही. त्यात तर शंकराचार्यांचा 'हात' नव्हता. आणि आचार्यांचा एक शिष्य ह्या व्यतिरिक्त तर त्याला आणखी कोणतीच मान्यता मिळाली नाही.
इथे श्री तात्यांचाही आक्षेप दिसला पण इतरत्र त्यांनी म्हटले आहे -
थोडक्यात एखादी घडलेली घटना, किंवा अनाकलनीय प्रसंग एकदा घडून जातो, तो कुणी घडवत नाही. तरच त्यातल्या अद्भूततेला अर्थ आहे, अन्यथा ती बुवाबाजीच ठरेल. पण लिखाळराव म्हणतात त्याप्रमाणे बुवाबाजीच्या परे असे काही अद्भूत अनुभव येत असतात हेही मात्र तितकेच खरे!