कोणत्याही रचनेला चातुर्य लागतेच पण ते चातुर्य जेंहा त्या रचनेला भिडणाऱ्याला अनपेक्षित वा अपेक्षितपणे नवा प्रत्यय देते तेंव्हा ती रचना त्या
भिडणाऱ्या व्यक्तीसाठी कला होते. 

पहिले- रचनाचातुर्य वेगळे आणि हुशारी वेगळी. प्रत्यय देण्यासाठी रुद्रायनाची हुशारी हवीच असे नाही.

त्याचबरोबर मी हुशारी करतो आहे हे इतरांना कळू नये इतपत रचनेत चातुर्य हवे.

मी चिरंतन, प्रत्ययदायी सृजन करतो आहे ह्या भ्रमात अनेक कवी वावरतात, असा माझा अनुभव. सांगतात अक्रोड, विकतात फुटाणे.

बरोबर प्रश्ण "हे चातुर्य आहे , पण ही कला (माझ्यासाठी) आहे का?" असा आहे :-)

तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच विचारला. तुमचा हा प्रामाणिकपणा भावला :)