रचनाचातुर्य वेगळे आणि हुशारी वेगळी. प्रत्यय देण्यासाठी रुद्रायनाची हुशारी हवीच असे नाही.

रुद्रायनात कोणतीही हुशारी नाही आणि त्याच्या रचनेत कोणतेही चातुर्य देखिल नाही.  तसा आविर्भाव देखील नाही... माझे कुतूहल वेगळेच आहे. माणसाच्या मूलभूत अर्थांन्वयी विचारसरणीत रुद्रायनाचे काय होते ?

त्याचबरोबर मी हुशारी करतो आहे हे इतरांना कळू नये इतपत रचनेत चातुर्य हवे.

इतरांचा बुध्यांक आणि भावनांक मोजून "कला" रचना केली तर कला कला राहते का? प्रामाणिक निश्चितच आहे पण तो इतरांना नाही पोचला तर अप्रामाणिक गिमिक करणार 'हुशार' पण अचतूर   ठरवले जातात.  लपवणे म्हणजे लाबाडपणा नाही का ?

मी चिरंतन, प्रत्ययदायी सृजन करतो आहे ह्या भ्रमात अनेक कवी वावरतात, असा माझा अनुभव. सांगतात अक्रोड, विकतात फुटाणे.

कोणा भासते जग मिथ्या माया कोणास वाटे जग हेच शाश्वत सत्य! :-)
इलाज नाही विकणाऱ्याचा अक्रोड घेणाऱ्याचा फुटाणा हा दृष्टिकोनातला फरक आहे. तो राहणारच ... एखाद्या गोष्टीची अचूक व्याख्या सरसमावेशक व्याख्या अवघड आहे... चिरंतन माहीत नाही प्रत्ययदायी निश्चितच असते अर्थात सृजन जो करतो त्याला...

तुम्ही हा प्रश्न स्वतःलाच विचारला. तुमचा हा प्रामाणिकपणा भावला :)

ह्या अभिनंदनास मी अपात्र आहे. कारण हा प्रश्न जो कविता वाचतो त्याच्या साठी आहे.  माझा दृष्टिकोन ' मी कलाकार नाही प्रामाणिक पणे तेंहा जे शब्द अर्थाअनर्थाने एकत्र आले ते आणि ह्या सृजन प्रक्रियाचा भाग असलेला मी साक्षीदार ह्याचा एकत्रित अस एक दस्तैवज समोर ठेवणे इतकेच'

धन्यवाद