विरभिंचे गोष्टीसंदर्भात स्पष्टीकरण मान्य होण्यासारखे आहे (जरी रेकी वगैरेशी माझे काही पटण्यासारखे नसले तरी). जर त्यांनी लेखात शेवटी असे म्हंटले असते की "..म्हणून शंकराचार्यांची रोज पूजा करा, उपास करा, वगैरे आणि न केल्यास अमूक तमूक (भीतिदायक) होईल," तर ती नक्कीच अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी एक प्रसंग म्हणून सांगितला. त्यातील "... चिदानंद रूप: शिवोहं शिवोहं" सांगणारा अद्वैताचा भावार्थ, तत्त्वज्ञान समजून वाचावे असे वाटते. नपेक्षा शंकराची आराधना करून हुशार मुलगा झाला या वाक्यापासूनच अंधश्रद्धा आहे.
आमच्याकडे बॉस्टनमधे (का ते माहीत नाही पण!) "झी टिव्ही" केबलवर आहे. त्यात तीन इंग्लंड्मधील महाराज कायम असतातः पंडीत महाराज, पीर सैय्यद साहीब आणि अजमेरी बाबा आणि ते कसे तुमची दु:खे पळवतात, त्यांना फोन करा वगैरे सांगीतले जाते. इतकेच नव्हे तर काही मालीका हे "बाबा" लोक प्रायोजीतही करतात! - असेही ऐकले आहे की कोणितरी नुसते बघायला (कि ही काय भानगड आहे) म्हणून लंडनला फोन केला, तर सुरवातीच्या माणसाशी बोलायचे कहीशे पाऊंडस व नंतर त्या बाबाशी बोलायचे म्हणून अ काही हजार पाऊंडस स्संगीतले. ही खरी अंधश्रद्धा आहे. पण झी टिव्हीला कोण बोलणार.
आयुर्वेदातील नाडीपरीक्षा माझ्या जवळच्यांनी अनुभवली आहे, ज्यात कसलेला वैद्य (मिलिंन्दराव नव्हेत!) लगेच रोगाचे मूळ सांगतो आणि मग साहजिकच चांगले उपचार करतो. प्रश्न आहे ते ज्ञान आत्मसात करण्याचा.