आपल्या जुन्या प्रतिसादातला काही भाग उद्धृत केला ह्याबद्दल क्षमस्व. त्यातला 'सोईस्कररित्या' काही भाग घेणे असा उद्देश नव्हता. अद्भुत गोष्टी अनाकलनीय असे पर्यंत अद्भुत असतात असे इतरांनाही वाटते, एवढेच दाखवायचे होते. उद्धृत करायचा उद्देश positive च होता. असो. मलाही अजून हा 'चमत्कार' पूर्ण पटत नाहीये पण तसेच मी त्याची शक्यता नाकारूही शकत नाही. फक्त कसे हे मला अनाकलनीय आहे.
शंकराचार्यांचा मोठेपणा दाखविण्यासाठी मी 'चमत्काराचा' आधार घेऊन त्यांच्याबद्दल लेखन केले असे नव्हे. शंकराचार्यांचा मोठेपणा दाखवून मला काही वैयक्तिक लाभ होणार होता/आहे असेही नव्हे. लेखन करतांना एव्हढा सगळा विचारही केलेला नव्हता. मी वा आणखी कोणी घसा फोडून त्यांचा मोठेपणा सांगायचे म्हटले तरी ते मोठे होणार नाहीत की त्यांच्याबद्दल कोणी अजिबात वाच्यता केली नाही तर त्यांचे मोठेपण कमी होणार आहे असेही नाही.