शंकराची आराधना करून हुशार मुलगा झाला या वाक्यापासूनच अंधश्रद्धा आहे.
म्हणजे वरील लेखात अंधश्रद्धा आहे हे आपल्याला मान्य आहे.
आता ती पसरविण्याचा प्रयत्न आहे किंवा नाही हा उपमुद्दा झाला. शंकराचार्यांची पुजा करा, उपास करा असे सांगितले नाही म्हणजे अंधश्रद्धा पसरवली नाही हा तर्क पटत नाही. पूजा करा अथवा करू नका, शंकराचार्यांनी आलिंगन देऊन कुष्ठरोग्याला नुसते बरे केले नाही तर, सतेज कांती बहाल केली, हा संदेशच अंधश्रद्धा (कुठल्याही औषधोपचाराशिवाय, त्या काळात असाध्य मानला गेलेला हा रोग बरा झाला ही) पसरविणारा आहे.