अभिजित,

अप्रतिम लिहिलं आहे तुम्ही. धमाल मजा आली वाचताना. आणखीन येऊ द्यात.

राग येणार नसेल तर विचारू इच्छिते, अश्विनी मनोगतवरदेखिल आहे का? त्यांचेही लेखन वाचायला आवडेल. प्रियालीप्रमाणेच मलादेखिल 'राणी'चं काय झालं असं वाटत आहे. :D

माझी आणि माझ्या दादाची जब्बरदस्त भांडणं, रुसवाफुगवी, मनवामनवी ( ही बऱ्याचदा मीच त्याची करायचे ! ) व्हायची.. आजही हे अगदी असंच सुरळीतपणे (?!) चालू आहेच म्हणा.. या सगळ्याची आठवण झाली.