मृदुला, मिलिंदा, पेठकर, तात्या ...
       प्रतिसाद देतांना मी माझे विचार मांडत होतो. वरीलपैकी तसेच इतरांचेही जे आक्षेप आहेत त्यांनी चमत्कारावर विश्वास ठेवावा असे मी म्हटलेलेही नाही आणि तसा माझा आग्रह तर मुळीच नाही. कृपया बैठक/पात्रता शब्द वापरले ते कोणत्या संदर्भात वापरले आहेत ते पाहावे. कोणाला कमी लेखण्याचा/कोणाच्या भावना दुखवायचा उद्देश अजिबात नाही. माझा सबंध प्रतिसादच चुकीच्या foundation वर होता हे कबूल करून मी सर्वांची क्षमा मागतो. आता प्रतिसाद काढणे हे माझ्या हातात नाही. तेव्हां मी प्रशासकांना विनंती करतो की जमल्यास 'चमत्काराला स्पष्टीकरण नसते' ह्या शिर्षकाचा प्रतिसाद काढून टाकावा. तो पर्यंत सर्व मनोगतींनी कृपया तो प्रतिसाद दुर्लक्षित करावा.
      आणि हो, मी शिक्षित आहे असा आतापर्यंत कधीही दावा केलेला नाही. तेव्हां कृपया मी अजूनही अशिक्षितच आहे असेच समजावे.