सर्वसामान्य माणसाला 'चमत्कार' ,ज्याला इंग्रजीत फँटसी(बरोबर आहे ना?) असे म्हणतात त्याचे कुठे तरी सुप्त आकर्षण असावे आणि म्हणूनच लोकांना अशा गोष्टी हव्याहव्याशा वाटतात.
एवढंच नाही. माणसं अडलेली असतात, समस्यांनी व्यथित असतात. पर्यायाने घाबरलेली असतात, दु:खी असतात. एका फटक्यासरशी या समस्यांचे निराकरण व्हावे अशी सुप्त इच्छा सर्वांचीच असते. वरील कुष्ठरोगाचे उदाहरण हेच तर दर्शवते. बुवाबाजी याचाच उपयोग करून घेते.
'बुवाबाजी' हा विषय मी चर्चेसाठी मांडला होता.त्यावरील अत्यल्प प्रतिसादावरून हेच सिद्ध होते की लोकांना हे सर्व मनातून आवडत असावे.
असं म्हणता येत नाही. पुन्हा पुन्हा तोच विषय उगाळून माणसं कंटाळलेली असावीत. (निदान मी तरी)