वृत्तान्त आवडला. चित्रगुप्त यांची गाणी काही सदाबहार ह्या सदरात मोडणारी नाहीत. आपला लेख वाचून विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या दिलका दिया, चल उड जा रे पंछी, ये परबतों के दायरे, रंग दिलकी धडकन ह्या आवडत्या गीतांच्या आठवणी जाग्या झाल्या. दिलका दिया तर तेव्हा खूपच आवडायचं. निवेदिका जे म्हणाली ते पटण्यासारखं आहे.

(मैं जब भी अकेली होती हूं, तुम चुपकेसे आ जाते हो ..... बीते दिन याद दिलाते हो ह्या गीताचं संगीतही चित्रगुप्त यांचंच आहे का? )