आपण सुशिक्षितच अंधश्रद्धेलाच श्रद्धा म्हणत, असे अनेक चमत्कार, त्या महान आत्म्यांच्या नांवाला, कारकीर्दीला चिकटवत त्यांच्या (ज्या काही असेल त्या) मूळ शिकवणीला दृष्टीआड करण्यात आघाडीवर आहोत मग अशिक्षितांचे काय?

आणि हो, मी शिक्षित आहे असा आतापर्यंत कधीही दावा केलेला नाही. तेव्हां कृपया मी अजूनही अशिक्षितच आहे असेच समजावे.

आपला त्रागा माझ्या प्रतिसादातील वरील विधानांना अनुसरून आहे असे वाटते. त्यात मी म्हंटलेले 'आपण' म्हणजे आपण सर्व. फक्त आपण (म्हणजे तुम्ही) नाही.
आपल्या लेखातील आचार्य आणि तरुणाच्या संवादावर मी भाष्य केलेले नाही कारण तो भाग मला अंधश्रद्धेचा वाटला नाही. पण, जे पटले नाही ते मुद्द्यांनिशी मांडले तर तो माझा प्रमाद झाला का? असे असेल तर आपल्या ह्या पुढील कुठल्याही लेखांचे वाचन आणि त्यावर मतप्रदर्शन मी करणार नाही.
चमत्कारांचा प्रसार करण्यापेक्षा अशा महात्म्यांची शिकवण इतरांपर्यंत (अगदी माझ्यासकट) पोहोचवा. भरकटलेल्या विचारांना दिशा मिळून प्रत्येकजण (माझ्यासकट) आचार विचारांमध्ये सुबुद्ध झाला तर समाजाची उन्नती होईल. 

आपणांस (तुम्हांस) मी अशिक्षित म्हंटलेले नाही, तेंव्हा तो मुद्दा चर्चेबाहेरच ठेवतो.