रेकि विषयी फारशी माहीती नाही पण जर आपण मानता की तो एक उपाय आहे तर मात्र --
३-४ महिन्यापूर्वी एका भाच्याला १० वीच्या परीक्षेत जेव्हां (परीक्षा चालू असतांना) मुलाच्या आईने मुलाच्या आईने फोन करून विचारले , 'कसा चाललाय त्याचा पेपर ? ' हिने सांगितले 'sound' ह्या संबंधी जे नियम असतात त्याबद्दल त्याचा काहीतरी १० मिनिटापासून गोंधळ होत होता पण आता तो प्रश्न सुटलाय. ' मुलाने घरी आल्यावर 'असेच' झाले होते म्हणून कबूल केले. हे असे परीक्षा संपेपर्यंत रोजच चालायचे. (परीक्षा चालू असतांना 'रेकी' पाठविण्याचा उद्देश असायचा की मुलाला माहीत असलेले वेळेवर सुचावे.
आपल्या अनुभवाचे आणि तो जाहिर लिहीण्याचे फार आश्चर्य वाटले. इतर विद्यार्थी अभ्यास करून केवळ आपल्या आठवणी व स्मरणशक्तीच्या आधारे पेपर सोडवत असता आपोअल्या भाच्याला बाहेरून प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष कुठल्याही प्रकारची मदत प्राप्त होणे ही इतर विद्यार्थांच्या बाबतीत एक प्रकारची फसवणूक आहे.
इतरांना हा प्रकार सिद्ध करणे शक्य आहे असे वाटत नाही परंतु सच्चाईने वागावे याला सदाचार मानाणाऱ्या स्वत:च्या मनाला अशा प्रकाराची टोचणी लागत असावी असे वाटते.
सदर प्रकार कुठेही घडत असल्यास तो आक्षेपजन्य आहे असे वाटते.