मित्रा, तुम्ही दिलेल्या प्रतिसादातील "आपण" ह्या शब्दाचे स्पष्टिकरण देताय ते unfair वाटते. जेव्हां मी काही general statement करतो तेव्हां मला अभिप्रेत नसलेले अर्थ माझ्या तोंडी घालून माझे विधान आपण आपला अपमान करण्याकरताच लिहिलेले आहे असे धरून चालताहात. कसे ?
विधान : बऱ्याच गोष्टी अनुभवाच्या असतात
मला अभिप्रेत असलेला अर्थ - गोड म्हणजे काय हे साखर तोंडात घातल्यावर (अनुभव घेतल्यावरच) कळते. कोणी पटवायचा प्रयत्न केला, बुकेच्या बुके वाचून काढली तरी (निदान मलातरी) समजणे शक्य नाही.
आपणांस दिसलेला अर्थ : 'म्हणजे मी कुष्ठरोगाचा अनुभव घ्यावा'. कारण आपण म्हटलेत 'मला कुष्ठ रोगाचा अनुभव घ्यायचा नाही'. अशा अर्थाचे विधान तर मी माझा कोणी कट्टर शत्रू असला तरीही करणार नाही. पण अशा विधानाचा आपण उल्लेख केलेला अर्थ निघू शकतो हे आता मला कळले.
विधान : बऱ्याच गोष्टी आपल्याला साधायला तर सोडाच पण समजण्यासाठीही एक बैठक लागते (पात्रता म्हणणार होतो, पण वाटले वाद निर्माण करणारा शब्द) -
मला अभिप्रेत असलेला अर्थ - मनोगतावरच कोणी उच्च प्रतीचे गणिती आहेत त्यांना गणित विषयात जी गति आहे ती साधायला तशा प्रकारची पात्रता लागते, कोणी खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांचे लेख समजायला देखील एक किमान पात्रता लागते, कोणी संगणक तज्ञ आहेत, ते सहज म्हणून देखील तांत्रिक विषयात जे काय लिहितात ते समजायलाही किमान तोंडओळख लागते. आपण स्वतः पाककृति कुशल आहात ती level स्वयंपाक गृहात ज्याने कधी पाऊलही ठेवले नाही त्याला सहज जमेल ? माझी समजूत होती की वरील विधानाचा साधारण (normal) अर्थ असा असतो. पण आता कळून चुकले की माझी समजूत अजिबात चुकीची होती. कारण -
आपणांस दिसलेला अर्थ - मी आपल्याला 'अपात्र' म्हणून मी आपला 'अपमान' करायचे ठरविले आहे. कारण आपण म्हणताय - अरेरे! शंकराचार्यांच्या अनुयायाला दुसऱ्याला 'अपात्र' संबोधून कमी लेखण्याचा मोह टाळता आला नाही. तरीही आपल्याकडून दुसऱ्याचा असा अपमान होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतो.' देवा, मी कधी गंमत म्हणून काहीतरी लिहून "ह. घ्या." म्हणायचे देखील कटाक्षाने टाळतो, कोणाचा अपमान करायचा विचार तर अशक्यच.
विधान : पण हे मी प्रत्यक्ष पाहिले तेव्हां पटले.
आपणास दिसलेला अर्थ : 'म्हणून मी मला काय पटलेय ते आपल्यालाही पटलेच पहिजे' असे माझे म्हणणे आहे. आणि तसे नसेल तर आपल्या प्रतिसादातील वाक्य - 'इतरांनाही, स्वतः पाहिल्यावर विश्वास ठेवण्याची, मुभा आहे का ?' ह्याचा काय अर्थ होतो हे मला समजलेच नाही.
आता आपण केलेले विधान : " आपण सुशिक्षितच अंधश्रद्धेलाच श्रद्धा म्हणत, असे अनेक चमत्कार,... " - ह्या विषयात तर आपण 'श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे' हे more than enough शब्दात स्पष्ट केले आहे, तेव्हां आपल्या विधानात अंधश्रद्धेला श्रद्धा म्हणणारे सुशिक्षित कोण ?, आणि त्याच विधानात असलेला "आपण" हा शब्द कोणाला उद्देशून आहे हे वेगळे सांगायला पाहिजे का ? पण आता लिहिताय, " त्यात मी म्हंटलेले 'आपण' म्हणजे आपण सर्व. फक्त आपण (म्हणजे तुम्ही) नाही. " ह्याचा अर्थ आपण एकमेकाला ओळखत नसतांना अप्रत्यक्षपणे मला अशिक्षित म्हणायचे आणि माझा अपमान करायचा ह्यात आपल्याला काहीच चुकीचे वाटत नाही. कारण त्याचा मी घेत असलेला अर्थ चुकीचा आहे. मित्रा, मी केलेल्या विधानांचा मला अभिप्रेत नसलेला अर्थ माझ्या तोंडी घालून मी आपला अपमान केला. त्याच न्यायाने आपणही माझा अपमान केलेला आहे. तरीपण मी काढलेला अर्थ चुकीचा आणि मी अकारण त्रागा करून घेतोय हेही सुचवले आहे. आपण तर " असा कोणाचा अपमान होऊ नये म्हणून प्रयत्नशील असता, आणि त्यात कधी आपल्याला अपयश आले नाही." कसे येणार ? कारण आपण अपमान करताय हे मान्य नाही म्हटले "आपणांस (तुम्हांस) मी अशिक्षित म्हंटलेले नाही" असे म्हटले की झाले काम. so simple.
मित्रा, मीही जाणून बुजून कधी कोणाचा अपमान होईल असे वागत नाही. माझ्या कोणत्याही विधानात आपण काढलेला अर्थ माझ्या मनांतही नव्हता. तरीही मी आपला अपमान केला आणि आपण माझा नाही हे मी कबूल करावे. ह्याउपर हेही सुचवायचे की मी त्रागा करून घेत असल्यास तो अस्थायी आहे. मी केलेल्या विधानाची आपण केलेल्या विधानाशी तुलना करायची नाही. Is it not unfair ?
आता ह्या प्रतिसादावर मी उगाचच शब्दांचा कीस काढतोय हा आरोपही होणारच. पण तसे केले नाही तर आपल्यात एकमेकाबद्दल झालेले समज कसे दूर होणार ? तरीपण ह्या शब्दांचा कीस व्यतिरिक्त मी मागेच क्षमा मागितलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.