शब्दांत (की समासात?) र असताना 'न' चा 'ण' होतो असं मीही शाळेत असताना शिकलोय/वाचलंय असं आठवतं...
'कोन'/'कोण'चा मुद्दा बाजूला ठेवला, तरी दक्षिणायन आणि उत्तरायण हे विशारदा यांनी दिलेलं उदाहरण या माझ्या ज्ञानाशी जुळणारं आहे.
मला स्वतःला त्यामुळे 'दृष्टिकोण' पटतो. ('दृष्टिकोन' म्हणजे उगाच तिरक्या कोनातून बघितल्यासारखं वाटतं.. ह. घ्या.)
एक गंमत आठवली. 'रावण' बरोबर की 'राभण'? - हा प्रश्न मला वाटतं कुणीतरी विचारला होता. त्याचं उत्तर 'राभण' असं आलं होतं - कारण बिभीषण आणि कुंभकर्ण यांच्याप्रमाणे 'राभण' मधेही 'भ' असायला हवा!
- कुमार