विकिकर,
आपण दिलेल्या दुव्यावरील लेख एका अगदी वेगळ्या विषयावर आहे यात शंका नाही. विशेषतः हिंदी आणि उर्दू वरील मजकूर तर पटेल असाच आहे. लेख वाचून उपखंडातील ज्या घटना सहजपणे आठवल्या त्या ह्या -
१) मुद्रणकलेचा शोध लागल्यावर मराठीने मोडी लिपी सोडून देवनागरीचा केलेला स्वीकार. त्यामुळे असंख्य ऐतिहासिक दस्त-ऐवज सामान्य मराठी वाचकासाठी निरुपयोगी.
२) नव्याने बनणाऱ्या प्रत्येक राष्ट्रभाषेसाठी देवनागरी हीच अधिकृत लिपी मानण्याचा भारत सरकारचा नियम. म्हणूनच सिंधी आणि कोंकणीसाठी देवनागरी हीच अधिकृत लिपी.
परिणामस्वरूप, दोन लिप्यांत विभागली गेलेली सिंधी भाषा.
३) चार राज्यात विखुरलेले कोंकणी भाषक वापरीत आहेत चार वेगवेगळ्या लिप्या.
४) पूर्व बंगालातील लोकांवर बंगाली भाषेसाठी पर्शो-अरेबिक लिपी लादण्याचा तत्कालीन पाक सरकारचा प्रयत्न आणि आपली मूळ बंगाली लिपी न सोडण्याचा त्यांचा निर्धार.
ज्या अनेक कारणांसाठी पूर्व बंगालातील लोकांनी स्वतंत्र होण्यासाठी चळवळ केली त्यात लिपी हे एक प्रमुख कारण.
लेखक अमेरिकन आहे.वेगवेगळ्या भाषा आणि पंथ वेगवेगळे राष्ट्रीयता असतात या पूर्वग्रहानेही प्रभावित आहे असे जाणवते.
पूर्वग्रह नव्हे, वास्तव.