आम्ही काय गुलाम आहोत?"

ते उत्तर ऐकून मीच एवढा थक्क झालो तर त्या बाईचं काय झालं असेल विचारच करायला नको.

या प्रसंगात कौतुक वाटण्यासारखं काय आहे? मला तर यात मुलांना इतरांशी सौजन्यपूर्वक कसे वागावे हे न शिकवल्याचे दिसत आहे.

एखाद्या हिंदु घरात, मुस्लिम किंवा ख्रिश्चनांनी पूर्वी केलेल्या सक्तीच्या धर्मांतराबद्दल ऐकून एखाद्या मुलाने जर कुठला परधर्मिय शेजारी कौतुकाने खायला काही घेऊन आला तर "आम्हाला काय बाटवायला आलात?" असे विचारले तर कसे वाटेल? 

शेजारधर्माचे किमान सौजन्य मुलांना शिकवावे आणि मोठ्या व्यक्तींचा आदर करायलाही शिकवावे हे योग्य. नाहीतर उद्या ते शेजारी नक्किच म्हणती " हे लोक ना , त्यांच्या तर लहान मुलांपासून सगळ्यांना बोलायाची शिस्त नाही"

लक्षात ठेवा जर तुम्हाला समाजात मिसळून जायचे असेल किंवा वगळले जावे असे वाटत नसेल तर सतत स्वतःच्या वेगळेपणाविषयी बोलणे वागणे सोडले पाहिजे. शेवटी आंबेडकरांनाही वाटत होते की तथाकथित उच्चनीच लोकांमधे वारंवार रोटीबेटी संबंध आले तरच हा समाज एकजिनसी होईल आणि इथला जातीभेद मिटेल.

शेजाऱ्यांचा प्रसाद उद्दामपणे नाकारून तरी नक्कीच नाही.

                                              साती