ग्रामिण महाशय,
आपल्या विचारांशी पूर्ण सहमत. मात्र सत्तेचे, जुलुमाचे फळ असलेली ही भिंत रुबाबात मिरवते, जागतीक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धी पावते, लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरते. मात्र अस्मिता, स्वाभिमान, अन्यायाचा प्रतिकार, महाराष्ट्राचा क्षात्रधर्म व त्याग यांचे प्रतिक असलेले सह्याद्रीतले किल्ले अजूनही उपेक्षित आहेत व दिवसेंदिवस ढासळत आहेत याची खंत वाटते.
शिवराय हा मराठी मनाचा एक मानबिंदू आहे आणि म्हणूनच भिंत पाहताना अनेक वेळा शिवरायांच्या गड-किल्ल्यांची आठवण येते. पुढील भागात काही चित्रे देणार आहे, जी पाहताना त्या वास्तूमध्ये व आपल्या किल्ल्यांमध्ये साम्य जाणवते.