पेठकरसाहेब, कढीची पाककृती जरूर देईन. माझ्या आजोळची समृद्धी म्हणाल तर मला वाटते पैशापेक्षा माणसे जोडण्यामधे होती. एवढ्या आपुलकीने सगळी माणसे यायची. थोरल्या आईचे दार नेहमीच सगळ्यांसाठी खुले असायचे. दारात आलेल्या गायीपासून ते आजोबांच्या आदरणीय मित्रांपर्यंत सगळ्यांनाच देण्यासारखे तिच्याकडे नेहमीच काहीतरी असायचे. आसपासच्या गावांहून येणारी ही मित्र मंडळीही मोकळ्या हातांनी कधीच यायची नाहीत. शेतातल्या भाज्या, फळं, कधी आंबेमोहोर तांदूळ, गुळाच्या ढेपींना तर अंतच नसायचा. हे सगळं तिने वाटून टाकण्यातच आनंद मानला, आणि त्यामुळेच ही समृद्धी असावी! 

अभिजीतजी, अत्यानंदजी, पेठकरसाहेब आणि शशांक,

लेख वाचून प्रतिसाद दिलात, मनापासून धन्यवाद. पहिलाच लेख आहे, कुणी वाचेल की नाही अशी धागधूग होती. आपल्यासारख्या मनोगतावरच्या बुजुर्गांकडून एवढ्या लगोलग प्रतिसाद पाहून छान वाटले. (बुजुर्ग हा शब्द आपल्या सर्वांच्या मनोगतावरील मी वाचलेल्या लेखनाच्या संदर्भात आहे, वयाच्या नाही याची नोंद घ्यावी! :))

शशांक, चिरमुऱ्यांबद्दल सहमत! चव आणि प्रतीमध्ये एवढा फरक कसा, हा प्रश्न मला नेहमी पडायचा.

-प्रभावित