हा जो काही प्रकार इथे दिलेला आहे, तो चवीला चांगला लागत असेलही कदाचित, पण तांत्रिकदृष्ट्या त्याला एस्प्रेसो म्हणता येणार नाही.

एस्प्रेसो म्हणजे अत्यंत बारीक दळलेल्या* व अत्यंत गच्च "पॅक" केलेल्या कॉफीच्या बियांच्या भुकटीतून** प्रचंड दाबाखाली अत्यंत गरम पाणी अथवा वाफ पार केल्यास जो उतरेल तो अर्क. (यात दूध, साखर वगैरे काहीही घालायचे नसते / वैकल्पिक असते. अर्थात घातल्यास बनणारे मिश्रण एस्प्रेसोव्यतिरिक्त इतर नावांनी ओळखले जाते, जसे एस्प्रेसो + फेसाळलेले दूध + वैकल्पिक साखर = कापुचिनो (Capuccino), किंवा क्यूबन लोकांमध्ये एस्प्रेसोचाच फक्त भरपूर साखर घोटून एक प्रकार बनतो, त्याला मायामीकडे Cafe Cubano म्हणून ओळखले जाते.)

* ही भुकटी नेहमीच्या कॉफीच्या भुकटीपेक्षा खूप बारीक दळलेली असली पाहिजे, परंतु टाल्कम पावडरीइतकीही बारीक असता कामा नये, जेणेकरून ती गच्च पॅक केली असता त्यातून प्रचंड दाबाखाली पाणी पार तर झाले पाहिजे.

** एस्प्रेसो ही नेसकॅफे / इन्स्टंट कॉफीपासून बनत नाही; विशिष्ट प्रमाणात दळलेल्या कॉफीच्या बियांच्या अत्यंत बारीक भुकटीपासून बनते.

अर्थात भारतात एस्प्रेसोच्या नावाखाली काय वाटेल ते खपवतात (किंवा खपवत असत), आणि उलटपक्षी कोणत्याही फेसाळणाऱ्या कॉफीला एस्प्रेसो म्हणून संबोधतात ( / संबोधत असत), हा भाग वेगळा!

अधिक माहिती इथे.

- टग्या.