शास्त्रीजींना मनःपूर्वक अभिवादन.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भातल्या एका लेखात लेखकाने 'जय जवान, जय किसान' घोषणेचे महत्त्व सांगितले होते. लहरी पावसाच्या जोरावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला जगण्यापुरते वार्षिक उत्पन्न मिळावे म्हणून कुटुंबातली एक तरी व्यक्ती नोकरी करणारी असली पाहिजे. ही नोकरी म्हणजे सैन्यातली. किसानाच्या संसाराला जवानाने असा हातभार लावला तर देश चालेल असा मथितार्थ.