सर्व मनोगतींना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
धन्यवाद आपणांसही विजयादशमीच्या शुभेच्छा.
बदलेल्या काळात, आपण जिथे असाल तिथे दसऱ्यासाठी काय करता ते समजले तर आवडेल.
पूर्वी इथे सहकुटुंब राहत असताना सर्व सणवार रितसत व्हायचे. सध्या एकटाच आहे. त्यामुळे विशेष काही करीत नाही.
मुलांना पाटी पूजा, गाडी / संगणक पूजा वगैरे करता का? सोने वाटायला जाणे - येणे असते का?
पूर्वी सर्व होते. ह्या आखाती देशातही भारतातून आपट्याची पाने मागवून (५ किलो) सोने वाटण्यासाठी जाणारा एकमेव होतो. आता एकटाच आणि सातत्याने आखातात नसल्यामुळे ती परंपरा मोडली आहे. हं, पण आज स्टाफसाठी केशरी श्रीखंड, बटाट्याची पिवळी भाजी, पुऱ्या, मसालेभात आणि नारळाची ओली/हिरवी चटणी असा स्वयंपाक केला आहे.
शेवटचा प्रश्न भारतातील भारतवासीयांबद्दल आहे, अनिवासी भारतीय (विशेष करून अमेरिकेतील)सर्वच सण शनीवार-रविवारी साजरे करतात, कदाचित वैयक्तिक पातळीवर एकच अपवाद असेल - गौरी-गणपतिचा.
आखातात असे होत नाही. एक कोजागरी वगळता सर्व सण वार त्या त्या दिवशी पाळले जातात. महाराष्ट्र मंडळाची कोजागरी मात्र नजिकच्या गुरुवारी रात्री (इथे आठवड्याची सुट्टी शुक्रवारी असते) साजरी केली जाते. वैयक्तिक पातळीवर तीही त्या रात्रीच (कोजागरीच्या) साजरी (दहीपोहे, दूधपोहे, चंद्राची पूजा इ.) केली जाते.